BJP with MNS | आज फडणवीस आणि राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, युतीच्या चर्चांना उधाण | Raj Thaceray

2021-08-07 2,050

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आज पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुणे मेट्रो प्रकल्पाची(Metro Project) पाहणी करणार आहेत. असं असलं तरी दुसरीकडे आज राज ठाकरेही(Raj Thakare) पुण्यातच आहेत. कालच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी राज ठाकरेंची(Raj Thakare) भेट घेतली होती. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची कबुली स्वत: चंद्रकांत पाटलांनी दिली. त्यामुळे आज फडणवीस आणि राज ठाकरे हे दोन्ही बडे नेते पुण्यात असल्यानं चर्चांना उधाण आलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. भाजप(BJP), शिवसेना(Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP)मनसेनंही(MNS) कंबर कसलीय. बड्या नेत्यांचे पुणे आणि पिंपरी चिंचवड दौरे, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी वाढल्यात. यामुळे आगामी पुण्यातील राजकारण चांगलेच तापणार आहे.
दरम्यान पुणे मेट्रोच्या(Pune Metro) ट्रायल रनचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र, आता पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींकडून सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकारण चांगलंच तापलंय.
#devendrafadnavisinpune #rajthakareinpune #ajitpawar #punetour #punemetro #punecity #punemetro #metroproject

Videos similaires